जान्हवी कपूर झाली २४ वर्षांची
बॉलीवूड मध्ये अल्पवधीत लोकप्रिय ठरलेली आणि तरुणाईच्या दिलाची धडकन जान्हवी कपूर आज म्हणजे ६ मार्च रोजी २४ वा वाढदिवस साजरा करते आहे. प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवीची म्हणजे आईची प्रतिमा भासणाऱ्या जान्हवीने तिचे साडीतील काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत. तिच्या या फोटोना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
आगामी चित्रपट ‘रुही’ च्या निमित्ताने जान्हवी सोशल मीडियावर सक्रीय झाली असून नवनवीन पोस्टर्स शेअर करत आहे. पांढरी साडी आणि त्यावर गोल्डन ब्लाउज मध्यील तिचे फोटो नुकतेच प्रसिध्द झाले आहेत. रुही चित्रपटात जान्हवी आत्म्याच्या ताब्यात गेलेल्या एका मुलीची भूमिका साकारत आहे. यात तिच्या बरोबर राजकुमार राव, वरुण शर्मा हेही काम करत आहेत. हा चित्रपट म्हणजे हॉरर कॉमेडी असून ११ मार्च रोजी रिलीज होत आहे.