जपानचे कुजू फ्लॉवर पार्क बहरले

जपान मध्ये वसंत ऋतूचे आगमन झाल्यावर तेथील ५४ एकर परिसरात असलेले कुजू फ्लॉवर पार्क विविध जातीच्या, रंगांच्या आणि सुगंधाच्या फुलांनी बहरले आहे. येथे ५०० प्रजातीची सुमारे ३५ लाख फुले फुलली असून हे उद्यान पर्यटकांसाठी शनिवारी खुले केले जात आहे.

अर्थात पार्क मध्ये गर्दी होऊ नये यासाठी मर्यादित संखेने प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांची संख्या फारच वाढली तर पार्कचे लाईव्ह स्ट्रीमिंग करून फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाणार आहेत. मार्च ते सप्टेंबर या काळात हे पार्क खुले असते. गतवर्षी करोना मुळे लॉक डाऊन असूनही लोकांनी गर्दी केल्याने शेवटी पार्क बंद केले गेले होते. तेव्हाही पार्कचे लाईव्ह स्ट्रीमिंग करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले गेले होते.

हे पार्क असलेल्या ताकेता या २३ हजार लोकसंख्येच्या शहरात दरवर्षी १० लाख पर्यटक येतात. गतवर्षी ७ हजार चौरस मीटर परिसरातील फुरुसुका पार्क मध्ये कोविड १९ साठी लागू केलेल्या नियमांचे पालन न करता लोकांनी गर्दी केल्याने तेथील १०० प्रकारची ८ लाख ट्युलिप कापून टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता.