जगभरात चहासाठी वापरले जातात चा आणि टी असे दोन शब्द

tea
कोणताही ऋतू असो सकाळी उठल्याबरोबर चहा मस्ट मानणारे कोट्यावधी लोक जगभर आहेत. त्यात पावसाळी हवा किंवा मस्त गारवा असेल तर गरमागरम चहा हवा अशीच भावना होते. मुळचा चीनी असलेल्या या चहाला जगभरात चा किंवा टी असेच शब्द वापरले जातात. भले त्याचा उच्चार त्या त्या देशाच्या उच्चारशास्त्राप्रमाणे होत असेलही.

विशेष म्हणजे चा आणि टी हे दोन शब्द जगभर कसे गेले त्याची माहिती मनोरंजक आहे. चीनमधून जेथे जेथे चहा जमीनमार्गाने पोहोचला त्यात्या देशात तो चाई किंवा चा म्हणून ओळखला जातो तर जेथे तो समुद्रमार्गे पोहोचला तेथे तो टी या अक्षराशी मिळत्याजुळत्या शब्दात ओळखला जातो. फ्रांस मध्ये थी, जर्मन मध्ये टी, स्पॅनिशमध्ये टे अशी त्याची नवे आहेत.

चा हा वेगवेगळी चीनी भाषेतील कॉमन शब्द आहे. त्यामुळे सिल्क रूटमार्गे व्यापार करणारे व्यापारी जेव्हा या शब्दाच्या संपर्कात आले त्यांनी हा शब्द त्यांच्यासोबत आपापल्या देशात नेला. जपान कोरिया मध्ये तो चा आहे. चीनी समुद्री भाग मीननॅन भाषेत चहाचा उच्चार टी असा आहे. त्यामुळे युरोपात आशियात व्यापार करणाऱ्या डच व्यापाऱ्यांनी १७ व्या शतकापासून टी याचा शब्दाचा वापर केला आणि युरोपीय देशात तो टी म्हणून प्रसिद्ध झाला.

Leave a Comment