जगातील पहिला १८ जीबी रॅम + ५१२ जीबी इंटरनल स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच


नवी दिल्लीः भारतीय बाजारपेठेत रेड मॅजिक 6 सिरीज चे दोन लेटेस्ट Gaming Smartphones लाँच करण्यात आले आहेत. रेड मॅजिक 6 आणि रेड मॅजिक 6 प्रो स्मार्टफोनला या सीरीज अंतर्गत बाजारात उतरवले आहे. स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्लेसोबत दोन्ही फोनला लाँच केले आहे. या लेटेस्ट सीरीजमध्ये कंपनीने हीट कमी करण्यासाठी अॅक्टिव्ह कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.

रेड मॅजिक 6 हा फोन अँड्रॉईड ११ वर आधारित RedMagic OS 4.0 वर काम करतो. या फोनमध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 165 हर्ट्ज़, सिंगल फिंगर टच सैम्पलिंग रेट 500 हर्ट्ज़, मल्टी-फिंगर टच सैम्पलिंग रेट 360 हर्टज आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो ६६० जीपीयूचा वापर केला आहे.

त्याचबरोबर 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी UFS3.1 स्टोरेज दिला आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5050 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये या फोनला लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत ४२ हजार ७०० रुपये आहे. फोनच्या १२ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४६ हजार रुपये आहे. या फोनला कार्बन फायबर ब्लॅकमध्ये लाँच केले. टॉप व्हेरियंटमध्ये १२ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४९ हजार ५०० रुपये आहे.

रेड मॅजिक 6 प्रो या फोनमध्ये फीचर्स रेड मॅजिक 6 सारखेच दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500 एमएएच बॅटरी दिली आहे. १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. रेड मॅजिक 6 प्रो १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत ४९ हजार ५०० रुपये आहे. १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार रुपये आहे. तर १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९ हजार ६०० रुपये आहे.

दोन कलर व्हेरियंटमध्ये ब्लॅक आयरन आणि आइस ब्लेड सिल्वरसोबत फोनला लाँच केले आहे. फोनचे एक ट्रान्सपेरेंट एडिशन सु्द्धा आहे. १६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येते. याची किंमत ६३ हजार रुपये आहे. फोनच्या १८ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किमत ७४ हजार २०० रुपये आहे.