जळगावच्या आशादीप वसतीगृह प्रकरणावरुन खडसे आक्रमक


मुंबई : जळगावमधील आशादीप वसतीगृहात पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा प्रकार खोटा असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. जळगावची आशादीप वसतीगृह प्रकरणात नाहक बदनामी झाली. विरोधी पक्षाने या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच बोलायला पाहिजे होते. जळगावाची या आरोपांमुळे बदनामी झाली, असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले. 4 मार्च रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत मांडला. या अहवालानुसार असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव जिल्ह्याची आशादीप वसतीगृह प्रकरणात बदनामी झाली आहे. सर्व माहिती घेऊनच या प्रकरणी विरोधकांनी यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.