कंगना म्हणते : अनुराग आणि तापसी हे फक्त टॅक्स चोर नाही, तर दहशतवादी आहेत


बुधवारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. 370 कोटींच्या टॅक्सी चोरीची माहिती या छापेमारीदरम्यान समोर आली. आता अभिनेत्री कंगना राणावतने या छापेमारीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर कंगनाने अनेक पोस्ट शेअर करत तापसी आणि अनुरागवर निशाणा साधला.

आपल्या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, चोर फक्त चोरच असतात, पण, जे मातृभूमीला विकून त्याचे तुकडे करतात, ते गद्दार असतात. जे गद्दारांना मदत करतात, तेही चोरच असतात. चोर-चोर मामे भाऊ आणि चोर ज्यांना घाबरतात, त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात.


आपल्या पुढच्या ट्विटमध्ये कंगनाने पुढे लिहीले, हे फक्त टॅक्स चोर नाहीत, तर यांनी काळ्या पैशाची मोठी देवाण-घेवाण केली आहे. यांना शाहीनबाग दंगल किंवा 26 जानेवारी रोजी हिंसा भडकवण्यासाठी पैसे मिळाले होते का ? काळा पैसा कुठून आला आणि कुठे पाठवला, याचा हिशोबच नाही..?


आपल्या पुढील पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, मिनिटा मिनिटाला हा आकडा वाढत आहे, हेच ते पैसे आहेत, ज्यांचा क्लू मिळाला आहे. विचारही करू शकत नाही, की मनी लॉन्ड्रिंगचा खरा आकडा काय आहे. या तुकडे-तुकडे गँगच्या दहशतवादावरुन पडदा बाजूला होत आहे. हे फक्त करचोर नाहीत, तर दहशतवादी आहेत.


त्याचबरोबर कंगनाने पुढे लिहिले, ‘मीटू कँपेन’दरम्यान Kwan एजंसी आणि फँटम प्रोडक्शन हाउसमधील लोक बलात्कारासारख्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी होते. पण, बॉलीवुडने त्यांना वाचवले. अनुराग कश्यपसारखे लोक फक्त बलात्कारातील आरोपी नाहीत, तर त्यांनी सुशांतच्या मृत्यूला बरोबर ठरवण्याचाही प्रयत्न केला.

तसेच कधीच कोणत्या महिलेचा शाप व्यर्थ जात नाही. आज सर्व रेपिस्टची लंका लागली आहे. अनेक पीडितांनी ‘फँटम फिल्म्स’ आणि kwan विरोधात आवाज उठवला होता, पण त्यांना अचानक गायब करण्यात आले. बॉलिवुडने यांना डोक्यावर बसवले होते. पण, आज सर्व बलात्काऱ्यांची लंका लागली आहे आणि आता बॉलीवुडचा नंबर आहे.