इराण मध्ये कोविड १९ च्या चौथ्या लाटेचा इशारा

इराणच्या राष्ट्रीय टीव्ही रिपोर्ट नुसार जानेवारी महिन्याची सुरवात झाल्यावर प्रथमच कोविड १९ मुळे एका दिवसात १०० हून अधिक मृत्यू झाले आहेत. यामुळे राष्ट्रपतीनी कोविड १९ ची चौथी लाट देशात येत असल्याचा इशारा दिला आहे. इराणचे आरोग्य, चिकित्सा मंत्री सीमा सादत लारी यांनी गेल्या २४ तासात १०८ लोकांचा बळी करोनाने घेतल्याची माहिती दिली आहे. यामुळे देशात कोविड १९ ची चौथी लाट आल्याची आशंका व्यक्त केली गेली आहे.

नवीन मृत्युंमुळे इराण मधील मृतांची एकूण संख्या ६०१९१ वर पोहोचली आहे. रविवार सोमवार या दोन दिवसात नवीन ८५१० रुग्ण आढळले आहेत. इराण मध्ये आत्ता १६,३९,३७९ जणांना कोविड १९ ची लागण झाली त्यापैकी १३,९९,९३४ रुग्ण बरे झाले आहेत. ३७२० गंभीर आजारी आहेत. गतवर्षी करोना साथ सुरु झाल्यापासून इराण मध्ये १०,९१२,४०६ नागरिकांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत.