यातली कोणती सुंदरी बनणार बुमराहची सहचरी?

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आठवड्यात बोहल्यावर चढत असल्याची बातमी लिक झाली असली तरी तो कुणाशी आणि कधी विवाहबद्ध होणार याची काहीच खबर आलेली नाही. जसप्रीत बुमराह भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात चौथी कसोटी खेळणार नाही. वैयक्तिक कारणाने त्याने सुटी मागितली होती असे सांगितले जात आहे मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने जसप्रीत लवकरच विवाह करणार असल्याने त्याने त्या तयारीसाठी सुटी घेतल्याचे सांगितले होते.

जसप्रीत बुमराहचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्यासोबत गेली दोन वर्षे जोडले जात आहे. २५ वर्षीय या तेलगु अभिनेत्रीने मात्र जसप्रीत बुमराह कोण आहे हे माहिती नसल्याचे आणि तो क्रिकेटपटू आहे इतकीच माहिती असल्याचा खुलासा करून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही महिलेबाबत सोशल मीडियावर काहीही प्रसिध्द केले जाण्याच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. अश्या अफवा पसरविणे ही दुःखद बाब असल्याचेही तिचे म्हणणे आहे.

क्रिकेट अँकर संजना गणेशन हिच्यासोबत सुद्धा जसप्रीतचे नाव जोडले गेले होते. ती आयपीएल मध्ये सक्रीय होती आणि स्टार स्पोर्ट्सशी जोडलेली आहे. मात्र ही २८ वर्षीय सुंदरी आणि जसप्रीत यांच्याबाबत नुसतीच चर्चा झाली होती. मद्रास कॅफे मध्ये अभिनय केलेली राखी खन्ना हिच्या सोबत सुद्धा जसप्रीतचे नाव जोडले जात होते मात्र ती नुसतीच अफवा असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या पत्नीबाबत त्याच्या चाहत्यांना खुपच उत्सुकता लागून राहिली आहे.