ट्विटर वर महिला या विषयावर करतात सर्वाधिक ट्विट

सोशल मिडिया हा आजकाल प्रत्येक युजरच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यात महिला वर्गाची संख्याही लक्षणीय आहे. सतत बोलण्यासाठी महिला प्रसिध्द असतात आणि सतत बोलूनही त्या नक्की कोणत्या विषयावर अधिक बोलतात हे सांगता येत नाही. ट्विटरने मात्र त्यांच्या प्लॅटफॉर्मवर महिला सर्वाधिक कोणत्या विषयावर ट्विट करतात याचा आढावा घेण्यासाठी महिला दिनाचे निमित्त साधून एक सर्व्हेक्षण केले आहे.

या सर्व्हेक्षणात ७०० महिला सामील झाल्या असून ५.२२,९९२ ट्विटसचे अध्ययन त्यासाठी केले गेले आहे. देशातील १९ शहरातील महिला यात सामील असून ९ कॅटेगरी मध्ये हे सर्व्हेक्षण केले गेले आहे.

जानेवारी १९ ते फेब्रुवारी २० या काळात केलेल्या या सर्व्हेक्षणात असे दिसले की महिला त्यांची आवड म्हणजे पॅशन याबद्दल सर्वात जास्त ट्विट करतात. हे प्रमाण २४.९ टक्के इतके आहे. यात फॅशन, पुस्तके, ब्युटी, एंटरटेनमेंट, फूड याचा समावेश आहे. करंट अफेअर २०.८ टक्के, सेलेब्रिटी मोमेंट १४.५ टक्के, समाज विषयक ११.७ टक्के तर सामाजिक बदल या विषयात ८.७ टक्के अशी ही आकडेवारी आहे.

पैकी सेलेब्रिटी मोमेंट ला सर्वाधिक लाईक्स व रिप्लाय आहेत. यात चेन्नई आघाडीवर असून सामाजिक विषयात बंगलोर, पॅशन बाबत गोहाटी येथील महिला आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे ११.७ टक्के महिला एक दुसऱ्याशी कनेक्ट होण्यास तयार नाहीत असेही आढळले असून ही बाब चिंताजनक असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे.