मस्कच्या गर्लफ्रेंडच्या डिजिटल कलाकृतीची ४२ कोटींना विक्री

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची गर्लफ्रेंड आणि सिंगर ग्रिमस हिची एक डिजिटल कलाकृती अवघ्या २० मिनिटात ५८ लाख डॉलर्स म्हणजे तब्बल ४२ कोटींना विकली गेली. इतकी किंमत मोजण्याइतके या कलाकृतीत काय खास आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ग्रिमसने तिच्या या डिजिटल कलेक्शनला ‘वॉरमिम्फ’ असे नाव दिले आहे. या कलाकृतीत एक देवदूतासारखा भासणारा मुलगा मंगळ ग्रहाचे कसे रक्षण करतो हे दाखविले गेले आहे. नॉन फंजीबल टोकन मध्ये या कलाकृतीची खरेदी केली गेली.

नॉन फंजीबल टोकन म्हणजे एनएफटी रुपात बीटकॉइन सारख्या दुसऱ्या डिजिटल करन्सीसह व्यवहार करता येतात. ग्रीम्स हिने तिची कलाकृती एनएफटी रुपात विकली गेल्याची माहिती ट्विटर वर दिली आहे. ग्रिमस म्हणते कलाकृतीत चितारलेली ही नियो जेनेसिस देवी आहे. ही कलाकृती साकारताना ग्रिमसने भावाची मदत घेतली. ग्रिमसच्या अन्य कलाकृतीत अंतराळात एक पंख असलेले बालक या कलाकृतीचा समावेश आहे. दोनच दिवसापूर्वी डोनल्ड ट्रम्प यांचा १० सेकंदाचा एक व्हिडीओ ४८.४२ कोटींना याच पद्धतीने विकला गेला होता.