आता फुकटात वापरात येणार नाही Twitter ?


नवी दिल्ली – आता युजर्सला मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर (Twitter) पूर्णपणे फुकटात वापरता येणार नाही. अशी अफवा सध्या पसरली आहे. पण ही गोष्ट खरी असून ट्विटरच नव्हे तर त्याची खास सर्विस सुपर फॉलो सर्व्हिससाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. त्याला हे एक पेड सब्सक्रिप्शन बेस्ड असणार असून सुपर फॉलो नावाने ओळखले जाणार आहे. याअंतर्गत कंटेट आणि हाय प्रोफाइल अकाउंट एक्सेस करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. ट्विटरला या फिचर सर्विसच्या माध्यमातून आपल्या रेवेन्यूमध्ये नफा होणार आहे. त्यासोबतच कंटेट क्रिएटर्सला सुद्धा यामधून पैसे मिळू शकतात. पण हे फिचर कधी लॉन्च केले जाईल याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच भारतातील लॉन्चिंग बद्दल ही काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

यासंदर्भात The Verge च्या रिपोर्ट्सनुसार, क्रिएटर्सला ट्विटरच्या नव्या सुपर फॉलो सर्विसच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कमाई करता येणार आहे. कंटेट क्रिएटर्स यासाठी आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून प्रतिमहिना 4.99 डॉलर्स (जवळजवळ 350 रुपये) प्रमाणे चार्ज करु शकतात. म्हणजेच ट्विटरवर फॉलोअर्सला खास कंटेट पाहण्यासह न्यूजलेटर मिळवण्यासाठी प्रत्येक महिना 350 रुपये शुल्क मोजावा लागणार आहे. यामध्ये ट्विटरची सुद्धा हिस्सेदारी असणार आहे. पण ट्विटरकडून त्यांच्या भागीदारी बद्दल सुद्धा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

दरम्यान, एक नवे सेफ्टी मोडचे ट्विटर ट्रायल करत आहे. त्यानुसार ट्विटरने असे म्हटले आहे की, ज्याला कम्युनिटीज (Communities) नावाने ओळखले जाणार आहे. हे एक फेसबुक ग्रुप फिचर्ससारखेच असणार आहे. लोकांना खास इवेंटससाठी ग्रुप तयार करता येणार असून त्यात अन्य लोकांना सुद्धा अॅड करता येणार आहे.