जसप्रीत बुमराह अडकतोय लग्नाच्या बेडीत

टीम इंडियाचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकत असल्याची खबर नुकतीच आली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे मात्र जसप्रीत कुणाशी आणि कधी विवाह करणार याची कोणतीही माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.

इंग्लंड विरुद्धच्या टी २० सिरीज मध्ये जसप्रीत बुमराहला आराम दिला गेला होता आणि इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्यानेच सुटी मागितली होती. या कसोटीतून आपल्याला मुक्तता द्यावी अशी विनंती त्याने बीसीसीआयला केली होती आणि ती मान्य करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. जसप्रीत जखमी असावा आणि म्हणून त्याने सुटी मागितली असावी असा अंदाज केला जात होता पण आता अंदरकी बात समोर आली आहे. एएनआयच्या बातमीनुसार बीसीसीआय अधिकाऱ्याने जसप्रीतला लग्नाच्या तयारीसाठी सुटी हवी होती आणि या आठवड्यात विवाहबद्ध होत असल्याचा खुलासा केला आहे.