देवभूमी उत्तराखंड मध्ये बनले शिव सर्किट

महाशिवरात्रीचा उत्सव देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शिव भक्तांसाठी या निमित्ताने एक चांगली खबर आहे. देवभूमी उत्तराखंड मध्ये भोलेनाथाच्या पौराणिक मंदिरांचे भाविकांना सहज दर्शन घेता यावे म्हणून शिव सर्किट तयार केले गेले असून यात प्राचीन २४ शिवमंदिरांचा समावेश केला गेला आहे. या पवित्र ठिकाणी भाविक जाऊ शकतील.

अल्मोडा येथील जागेश्वर मंदिर, पीथोरागड च्या गंगोलीहाट मधले पाताळ भुवनेश्वर मंदिर, बागेश्वरचे बागनाथ महादेव, क्रांतेश्वर महादेव, नैनिताल येथील भीमेश्वर महादेव, उधमसिंग नगर काशीपूर येथील मोटेश्वर महादेव, टिहरी येथील कोटेश्वर महादेव, प्रसिद्ध केदारनाथ, उखीमठ येथील  मध्यमेश्वर महादेव, चोपता येथील तुंगनाथ महादेव, उत्तरकाशी येथील काशी विश्वनाथ, हरिद्वार येथील दक्ष प्रजापती, चमोली येथील रुद्रनाथ, उर्गम कल्पेश्वर महादेव, नीती घाटी येथील टिंबरसण महादेव, सतपुरी एकेश्वर, थालीसन येथील बिनसर महादेव, लँसडाऊन येथील ताडकेश्वर, देहरादून येथील टपकेश्वर महादेव आणि लाखामंडळ येथील पौराणिक शिवमंदिर यांचा समावेश आहे.

ही सर्व मंदिरे अतिशय प्राचीन असून त्यातील काही मंदिरांबाबत अजूनही अनेकांना माहिती नाही. शिव सर्किटचा उद्देश देशातील या अतिप्राचीन वारश्याची माहिती लोकांना व्हावी हा असल्याचे सांगितले जात आहे.