पुणे शहरातील ‘या’ भागात गुरुवारी येणार नाही पाणी


पुणे : गुरुवारी (4 मार्च) महापालिकेच्या लष्कर व नवीन होळकर पंपिंग येथील पंपींग, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे या ठिकाणाहून होणारा लष्कर भाग, पुणे स्टेशन, नगररोड, लोहगाव या भागातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शहरात शुक्रवारी (5) उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या भागात गुरुवारी येणार नाही पाणी ः लष्कर जलकेंद्र – लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी

नवीन होळकर पंपिंग – विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड