पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे रोहित पवारांनी केली ही मागणी


मुंबई – सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केल्याचे केंद्रातील काही मंत्री म्हणतात, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून नवे कृषी कायदे आणले जात असल्याचेही काही केंद्रीय मंत्री म्हणतात. म्हणजेच केंद्रीय मंत्र्यांमध्येच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले की करायचे आहे याबाबतच एकमत नाही.

सध्या देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा मुद्दा गाजत आहे. देशातील अनेक भागात पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभर रूपयांपेक्षा पुढे गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी केंद्र सरकारने करावे, अशी मागणी केली जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच केंद्रीय अर्थमंत्रालय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमन यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.


वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांबद्दल रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे; मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा!, असं पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना रोहित पवार यांनी म्हटले आहे.