टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोनाची लस


नवी दिल्ली – आज भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती रवी शास्त्री यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 1 मार्चपासून भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून या टप्प्यात 60 वयोगटापुढील ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. तसेच 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त लोकांना देखील ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान आज रवी शास्त्री यांनी कोरोनाची लस घेतली. ही लस घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण वैद्यकिय टीमचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत.


कोरोना व्हॅक्सिनचा आज मी पहिला डोस घेतला. कोरोना व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले त्याने जगभरात देशाची मान उंचावली गेली आहे. या सर्वांचे मी आभार मानतो, अशा आशयाचे ट्विट रवि शास्त्री यांनी केले आहे.