खासगी रुग्णालयात 250 रुपये देऊन डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस


नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या दिवशी आज कोरोना लस घेतली. खासगी रुग्णालय दिल्ली हार्ट अँड लंग्स इंस्टीट्यूटमध्ये त्यांनी 250 रुपये देऊन कोव्हॅक्सिन लस घेतली. आरोग्य मंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नीनेही लस घेतली.

आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा डोस आरोग्यमंत्र्यांनी घेतला. लस घेतल्यानंतर ते म्हणाले की, ही लस संजीवनीप्रमाणे काम करेल. हनुमानाला संजीवनी आण्यासाठी खूप दूर जावे लागले होते, पण ही संजीवनी तुमच्या जवळच्या रुग्णालयात मिळून जाईल.

दरम्यान, आज केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील कोरोना लस घेतली. त्यांनी पटणा एम्समध्ये पहिला डोस घेतला. तर, अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये डालमिया रुग्णालयात लस घेतली.