पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी, पीएनजीचा भडका


नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी, पीएनजीही महागले असून सीएनजी गॅस दिल्लीत 70 पैशांनी तर पाइप्ड नॅच्युअरल गॅसमध्ये 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज सकाळी 6 पासून लागू करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) सांगितले की, सीएनजीची किंमत 43.40 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद याठिकाणी सीएनजीची किंमत 49.08 रुपये प्रतिकिलो दर आहे. दिल्लीत पीएनजीची किंमत 28.41 प्रति एसएम आहे.

काल 25 रुपयांची वाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 819 रुपये मोजावे लागणार आहे. एलपीजी गॅसच्या दरात 24 फेब्रुवारीला 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात चौथ्यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यातच सिलेंडरच्या किंमतीत एकूण 100 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.