विराटने केले  क्रिकेट बाहेरचे जागतिक रेकॉर्ड

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने क्रिकेट मध्ये असंख्य रेकॉर्ड नोंदविली आहेतच पण आता त्याने क्रिकेट बाहेर सुद्धा जागतिक रेकॉर्ड केले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर विराटच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटींवर गेली असून हा जादुई आकडा गाठणारा तो जगातला पाहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

आधुनिक क्रिकेटमधला धडाकेबाज फलंदाज विराट, असा विक्रम करणारा पाहिला क्रिकेटपटू असला तरी क्रीडा क्षेत्रातला पाहिला खेळाडू नाही. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन क्रमांकावर फुटबॉलपटू आहेत. पैकी पहिल्या क्रमांकावर पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टीयानो रोनाल्डो २६६ मिलियन म्हणजे २६ कोटी ६० लाख फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे. दोन नंबरवर अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी याचेही इतकेच फॉलोअर्स आहेत. तीन नंबरवर ब्राझीलचा नेमार असून त्याचे १४ कोटी ७० लाख फॉलोअर्स आहेत. विराटने केलेल्या रेकॉर्ड बद्दल आयसीसीकडून त्याचे अभिनंदन केले गेले आहे.

इन्स्टाग्राम वरील सेलेब्रिटी यादीचा विचार केला तर विराट येथे २३ व्या स्थानावर आहे. त्याने बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (६ कोटी फॉलोअर्स ) आणि श्रद्धा कपूर ५ कोटी ८० लाख फॉलोअर्स यांना मागे टाकले आहे.