बिल गेट्स यांची पहिली पसंती अँड्राईड फोनला

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक आणि जगातील धनकुबेराच्या यादीत तीन नंबरवर असलेले बिल गेट्स यांनी त्यांची पहिली पसंती आयफोन पेक्षा अँड्राईड स्मार्टफोनला असल्याचे सांगितले. इंटरनॅशनल वेबसाईटवरील एका मुलाखतील गेट्स बोलत होते.

यावेळी बोलताना गेट्स म्हणाले मी नेहमी आयफोनच्या जवळपास असतो पण मी अँड्राईड स्मार्टफोन जवळ बाळगतो. माझी पहिली पसंती अँड्राईड स्मार्टफोन हीच आहे कारण या फोनच्या इकोसिस्टीम मध्ये मायक्रोसॉफ्टवेअर प्री इन्स्टॉल असल्याने हे फोन वापरणे अतिशय सोपे जाते. हाच फोन वापरण्याची सवय पडलीय. माझे सर्व मित्र आयफोन वापरतात पण माझी पसंती अँड्राईड फोनला आहे. बिल गेटस यांची संपत्ती १३५ अब्ज डॉलर्स असून ते जगातील श्रीमंत यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.