तोडफोडीनंतर ६ महिन्याने कंगनाची ऑफिसला भेट- शेअर केले फोटो

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त विधानांनी आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. मुंबई महानगरपालिकेने तिच्या मुंबई कार्यालयात तोडफोड केल्यावर सहा महिन्यांनी कंगनाने ऑफिसला भेट दिली आणि ऑफिस चे फोटो शेअर केले आहेत. सहा महिन्यानंतर सुद्धा ऑफिस आहे त्याचा स्थितीत आहे आणि त्यामुळे माझ्या हृदयाला वेदना होत आहेत असे कंगनाने म्हटले आहे.

कंगना तिच्या व्यवसायानिमित्त घ्याव्या लागणाऱ्या सर्व बैठका तिच्या घरीच घेते आहे. कंगना म्हणते माझ्यासोबत मनकर्णिका फिल्म्सची स्थापना करणारे माझे भागीदार आज माझ्यावर दाखल झालेले ७०० खटले एकटेच सांभाळत आहेत. आज त्यांनीच ऑफिस मध्ये बैठक घेण्याचा आग्रह धरला. मी तयार नव्हते तरीही मला त्यांनी येथे येण्यास प्रोत्साहन दिले.

९ सप्टेंबर २०२० मध्ये बीएमसीने कंगनाने ऑफिस मध्ये अवैध बांधकाम केल्याचे सांगून नोटीस दिल्याचा २४ तासात ऑफिस तोडण्याची कारवाई केली होती. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने बीएमसीला पाडापाडीचे काम त्वरित थांबविण्याचे आदेश दिले होते शिवाय कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असाही आदेश दिला होता. त्यावर कंगनाने दोन कोटींची नुकसान भरपाई मागितली होती. कंगनाने हे ऑफिस ४८ कोटी रुपये खर्चून खरेदी केले होते असे सांगितले जाते.