जगातले हे आहे सर्वाधिक महाग प्राचीन नाणे
प्राचीन नाणी आणि त्याच्या हजार, लाखातील किंमती याबद्दल आपण अनेकदा ऐकतो. मात्र एखाद्या नाण्याची किंमत करोडो मध्ये सुद्धा असू शकते पण त्याविषयी आपल्याला फार माहिती नसते. जगातील सर्वाधिक महागडे नाणे असेच करोडो किमतीचे आहे. हे ऐतिहासिक नाणे अमेरीकेचे असून त्याचे नाव फ्लाइंग हेअर सिल्व्हर डॉलर असे आहे.
हे प्राचीन नाणे १७९४ मध्ये अमेरिकेत जी १९५८ चांदीची डॉलर नाणी बनविली गेली त्यातील पहिले नाणे आहे असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. हे नाणे स्वतः जॉर्ज वॉशिंग्टनने तपासले होते असेही सांगितले जाते. आज हे जगातील सर्वात महागडे नाणे असून त्याची किंमत भारतीय रुपयात चक्क ७० कोटी रुपये आहे. टेलिग्राफच्या बातमीनुसार या नाण्याला २०१३ मध्ये एका संग्रहकाने १ कोटी डॉलर्स मोजून खरेदी केले होते.