अशा पद्धतीने वापरा व्हॉट्सअॅपचे नवीन Mute Video फीचर


नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप कंपनीने अखेर Mute Video फीचर लाँच केले असून व्हॉट्सअॅपचे हे फीचर याआधी टेस्टिंगसाठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. गेल्या महिन्यात या फीचरची माहिती व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सला ट्रॅक करणाऱ्या ब्लॉग WABetaInfo ने दिली होती. ट्विटरवर याची घोषणा आता फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीने केली आहे. सर्वसाधारण युजर्ससाठी म्यूट व्हिडिओ फीचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

काही युजर्संच्या हवाल्याने WABetaInfo ने आधी सांगितले होते की, अॅप बीटा व्हर्जनला वापर करीत असलेले यूजर्स v2.21.3.13 द्वारे नवीन फीचरला रिसिव्ह करू शकतील. युजर्सला कोणत्याही व्हिडिओला आपल्या कॉन्टॅक्ट सोबत शेयर करण्याआधी हे फीचर म्यूट करू शकेल. व्हिडिओ एडिटिंग स्क्रीनवर नवीन म्यूट व्हिडिओ फीचरला पाहिले जाऊ शकते. व्हिडिओ एडिट स्क्रीन वर सर्वात वरच्या कोपऱ्यात एक व्हॅल्यूम आयकॉन दिसतो. यावर क्लिक केल्यानंतर शेअर केले जाणार आहे. त्यानंतर व्हिडिओ म्यूट होणार आहे. जर तुम्हाला हे फीचर मिळाले असेल तर या फीचरचा वापर कसा करायचा याची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

अशा प्रकारे वापरला व्हॉट्सअॅपचे नवीन Mute Video फिचर

  • सर्वात आधी गुगल प्ले स्टोरेवर व्हॉट्सअॅप उघडा. जर तुमचे अॅप अपडेट नसेल तर तुम्ही तुमचे अॅप अपडेट करा.
  • आता तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅपवर जा. इंड्यूविज्यूअल चॅट आणि स्टेट्स मोड या दोन्ही करिता म्यूट व्हिडिओ फीचर उपलब्ध आहे.
  • नवीन म्यूट व्हिडिओ फीचरचा वापर करण्यासाठी कोणत्याही व्हिडिओला रिकॉर्ड करा किंवा आधीच फोनमधील रेकॉर्डेड व्हिडिओला एडिट करा.
  • तुम्ही ज्यावेळी एडिट स्क्रीनवर जाल. त्यावेळी सर्वात वरच्या कोपऱ्यात व्हॅल्यूम आयकॉन दिसेल. यावर टॅप करून व्हिडिओ म्यूट होईल. यानंतर व्हिडिओला आपल्या कॉन्टॅक्ट सोबत शेअर करू शकता. त्यानंतर स्टेट्स म्हणून सेट करू शकता.
  • त्या व्हिडिओला व्हॉट्सअॅपच्या या फीचरने मदत मिळण्यास होईल, जो विना कोणत्याही बॅकग्राउंड ऑडियोचा व्हिडिओ शेअर करू शकतील. हे फीचर इंस्टाग्रामवर आधीच उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप Mute Video फीचर फक्त अँड्रॉईड युजर्संसाठी उपलब्ध आहे.