बिग बींवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन उर्फ बिग बीने सोशल मिडियावर ब्लॉग मधून त्यांची तब्येत बिघडल्याचे व सर्जरी करावी लागणार असल्याची माहिती दिल्याने काळजीत पडलेल्या त्याच्या मोठ्या चाहत्या वर्गासाठी चांगली बातमी आहे. बिगबी यांच्या डोळ्यावर लेझरच्या सहाय्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली असून सोमवारी त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला जात असल्याचे समजते.

७८ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी शानिवारी लिहिलेल्या ब्लॉग मध्ये ‘ मेडिकल कंडीशन, सर्जरी, मी लिहू शकत नाही इतकीच माहिती दिली होती. अमिताभ त्याच्या संबंधातल्या अनेक छोट्या छोट्या बातम्या सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात. या पूर्वी केलेल्या एका ट्विट मध्ये बिगबीनी ‘गरजेपेक्षा काहीतरी जास्त वाढलेय, कापावे लागेल’ अशी माहिती दिली होती.

अमिताभ यांचे ब्रह्मांड, झुंड, चेहरे, मे-डे हे चित्रपट या वर्षात प्रदर्शित होणार आहेत. १५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी यांच्या बॉलीवूड कारकिर्दीला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत.