आयपीएल २०२१ सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले

आयपीएलचा १४ वा सिझन सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले असून या स्पर्धेतील तीन फ्रान्चायझीनी स्पर्धेच्या आयोजन स्थळाबाबत कडक नाराजी व्यक्त केली असून त्यासंदर्भात लिखित तक्रार दाखल केली असल्याचे समजते. मिडिया रिपोर्ट नुसार करोना काळात बीसीसीआयने लीग स्पर्धेसाठी प्रथम पुणे, मुंबईची निवड केली होती व प्ले ऑफ साठी अहमदाबादची निवड केली गेली होती. पण आता बीसीसीआयने दोन ऐवजी ५-६ शहरात हे सामने खेळविण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.

क्रिकबजच्या बातमीनुसार यामुळे राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैद्राबाद यांनी सामन्यांसाठी निवडलेल्या शहरांबद्दल आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात करोना वाढतो आहे हे पाहून बीसीसीआयने दुसरा पर्याय तयार केला आहे. त्यानुसार चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, बंगलोर या शहरात सामने खेळविण्याचा विचार केला असून या यादीत मुंबई हे सहावे शहर आहे.

पण यामुळे वरील तीन संघांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे कारण स्पर्धा नियमानुसार प्ले ऑफ मध्ये त्याच टीम जाऊ शकतात ज्यांनी घरेलू मैदानावर चांगली कामगिरी बजावली आहे. या नियमाचा फायदा बाकी टीमना अधिक होणार असल्याचे वरील तीन संघांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे सामने त्रयस्थ स्थळी घ्यावेत अशी त्यांची मागणी आहे.