आयकिया वाढविणार भारतीय खेळण्यांची खरेदी

स्वीडनची फर्निचर क्षेत्रातील दिग्गज अग्रणी कंपनी आयकिया भारतात व्यवसाय विस्तार करत असून त्यासाठी भारतीय खेळण्यांची खरेदी वाढविली जाणार असल्याचे संकेत आयकिया इंडियाच्या मार्केटिंग प्रमुख कविता राव यांनी दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आयकिया मध्ये लहान मुलांसाठी असलेल्या उत्पादने साखळीत १ हजाराहून अधिक उत्पादने आहेत. या किड्स रेंज मध्ये विक्रीत वर्षात १२ टक्क्यापेक्षा अधिक वाढ करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनी भारतातून सध्या फक्त कापसाची सॉफ्ट टॉईज खरेदी करते आता त्यात भारतीय लाकडी खेळणी सुद्धा सामील केली जाणार आहेत. कंपनीने त्या दृष्टीनेच खेळणी प्रदर्शनात भाग घेतला होता असे राव यांनी सांगितले. कंपनी विक्री वाढीसाठी खेळणी उत्पादक आणि भारतीय खेळाडू यांच्याबरोबर भागीदारीचा सुद्धा विचार करणार असल्याचे समजते.