भारतात सर्वात जास्त पांढऱ्या रंगाच्या गाड्यांची का होते विक्री ?

car1जेव्हा चार चाकी वाहन खरेदी करायचे असते तेव्हा पहिला विचार केला जातो कोणत्या रंगाची कार घ्यावी जी दिसायला स्टाइलिश आणि चालवायला आरामदायी असेल. कोणत्या रंगाची कार खरेदी करावी यावरुन अनेक लोकांमध्ये गोंधळ असतो.
car2
अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ज्यात असे म्हटले आहे की, 2018 मध्ये 43 टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. आता हा प्रश्न उद्भवतो: की लोकांना पांढऱ्या रंगाची कार का आवडते?
अहवालात म्हटले आहे की, पांढऱ्या रंगानंतर राखाडी रंगाची कार घेणे लोक पंसद करतात. हा रंग हलका आणि दिसायला छान दिसतो, म्हणून लोक या रंगाची निवड करतात त्यांच्यानंतर सिल्वर रंगाची कारलाही भारतीय खुप पंसद करतात.
car3
अहवालात असे आढळून आले आहे की, इतर लोकप्रिय गाडयांमध्ये लाल रंगाची कार 9%, निळ्या रंगाची कार 7%, आणि काळ्या रंगाची कार फक्त तीन टक्के लोक विकत घेतात. हा अहवाल पेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी बीएएसएफने तयार केला आहे.
car4
बीएएसएफ ही जगातील सर्वात मोठी केमिकल कंपनी आहे. कंपनीचे प्रमुख (एशिया प्रशांत), चिहारु मतसुहारा म्हणाले की, भारतात पांढऱ्या रंगाच्या गाड्या सर्व जास्त खरेदी केल्या जातात. त्यांनी यावर एक वैज्ञानिक कारण देखील सांगितले.
car5
चिहारु मतसुहारा म्हणाले की, भारतात पांढऱ्या गाड्या विकल्या जातात कारण येथे हवामान अतिशय गरम आहे आणि पांढरे गाड्या सहज गरम होत नाहीत.

Leave a Comment