सर्वप्रथम ‘या’ 20 लक्षणांच्या रूग्णांना दिली जाणार लस; केंद्र सरकारने जारी केली यादी


नवी दिल्ली : उद्यापासून अर्थात एक मार्चपासून देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून केंद्र सरकारने याबाबत शनिवारी अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये 20 आजारांनी ग्रस्त रूग्णांना दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. त्यानुसार खालील दिलेल्या पैकी लक्षणे असलेल्यांना लस दिली जाणार आहे.

  • मागील वर्षी हृद्यविकाराचा झटका आला असेल. (हॉस्पीटलमध्ये दाखल व्हावे लागले असेल)
  • पोस्ट कार्डियक ट्रान्सप्लांट (एलव्हीएडी)/लेफ्ट व्हेंट्रीकुलर असिस्ट डिव्हाईस.
  • लेफ्ट व्हेंट्रीकुलर सिस्टोलिक डिसफंक्शन.
  • मध्यम स्तर किंवा जास्त स्तराचा हृदयरोग.
  • कंजेनायटल हार्ट डिसीज.
  • कोरोनरी आर्टरी डिसीज, मधुमेह, उच्चरक्तदाब (बीपी), हायपरटेंशनचे रूग्ण ज्यांचा उपचार सुरू आहे. एन्जायनासह हायपरटेंशन आणि डायबिटीज.
  • सीटी एमआरआय डक्यूमेंटेड स्ट्रोक.
  • पल्मोनरी आर्टरी डिसीज.
  • डायबिटीज (10 वर्ष जुने प्रकरण किंवा गुंतगुंतीसह) आणि हायपरटेंशनचा उपचार सुरू असलेले रूग्ण.
  • किडनी/लिव्हर/हेमाटोपोयएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट केलेले/प्रतीक्षा यादीत नाव असलेले.
  • किडनीच्या आजाराचा शेवटचा टप्पा/सीएपीडी.
  • मौखिक कॉर्टिकोस्टेरॉइड/इम्यूनोस्प्रेसेन्ट औषधांचा सध्या मोठ्या कालावधीपासून वापर.
  • विघटित सिरोसिस.
  • सीवियर रेस्पिरेटरी डिसीज.
  • मागील दोन वर्षात हॉस्पीटलमध्ये दाखल/एफव्हीई1 50 टक्केसह गंभीर श्वसनरोग.
  • लिम्फोमा/ल्यूकेमिया/मायलोमा कोणत्याही ठोस कॅन्सरचे निदान 1 जुलै 2020 किंवा त्यानंतर कोणत्याही कॅन्सरचे उपचार.
  • सिकल सेल रोग /अस्थी मॅरोव्ह विफलता/अप्लास्टिक एनीमिया/थॅलेसीमिया मेजर.
  • प्राथमिक इम्यूनोडिफशियन्सी रोग/एचआयव्ही संसर्ग.
  • बौद्धिक अक्षमता/पेशी अविकास/अ‍ॅसिड अटॅकमुळे श्वसन प्रणालीमध्ये सामिल होण्याचे कारण, अपंगामध्ये उच्च आवश्यकता असणारे विकलांग/बहिरे-अंधळेपणासह अनेक अपंग.