पश्चिम आफ्रिकेमध्ये परंपरेच्या नावावर सुरु आहे अत्यंत अघोरी प्रथा

africa
मारिटानिया – परंपरेच्या नावावर पश्चिम आफ्रिकेमध्ये अत्यंत अघोरी प्रथा सुरू असून आतापर्यंत महिलांना सेक्स आणि इतर स्वार्थासाठी पुरुषांनी नेहमीच दाबून ठेवले आहे. महिलांचा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीही गैरवापर करण्यात आलेला आहे. पण एक भलतीच विचित्र परंपरा आता समोर आली आहे. महिलांना येथे उंटाचे दूध, बकरीचे मांस आणि प्राण्यांना दिले जाणारे केमिकल खाऊ घालून परंपरेच्या नावाखाली जाड बनवले जात आहे.

अशाप्रकारे पुरुषांची हुकूमशाही मारिटानिया येथे महिलांवर चालते. ही हुकूमशाही म्हणजे महिलांवर वजन वाढवण्यासाठी दिला जाणारा दबाव. महिलांना येथे बळजबरी वजन वाढवण्यास सांगितले जाते. लहानपणापासूनच येथे मुलींना वजन वाढवण्यास सांगितले जाते. म्हणजे जाड होऊन त्या सुंदर आणि शरीराने भरलेल्या दिसतील असे येथील पुरुषांना वाटते. जाड पत्नी म्हणजे संपन्नता आणि समृद्धी तर सडपातळ पत्नी म्हणजे गरीबी अशी येथील मान्यता असल्यामुळेच तरुणींना रोज 16 हजार कॅलोरीपर्यंत बळजबरी खाऊ घातले जाते. ते सरासरीपेक्षा आठपटीने जास्त आहे.

Leave a Comment