इस्रोने लॉन्च केली या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम


बंगळुरु : इस्रोने यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च केली आहे. सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी PSLV द्वारे 19 उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण झाले. PSLV-C51 हे PSLV चे 53 वे मिशन आहे. या माध्यमातून अंतराळात ब्राझीलचा अ‍ॅमेझोनिया – 1उपग्रहही पाठवला जाणार आहे. अ‍ॅमेझोनिया -1 प्रायमरी सॅटलाईट आहे. तसेच अन्य 18 उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यापैकी किडझ इंडियाने एक उपग्रह तयार केला आहे.

इस्रोने म्हटले आहे की, अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास अमेझोनिया -1 ची मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल. 18 अन्य सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेस मधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत. यात श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी 14 एनएसआयएलची निर्मिती आहे.