‘या’ देशात ब्रेड बनविण्यासाठी किड्याचा केला जातो वापर

bread हेल्सिंकी – अनेक जण आपल्या आहारात ब्रेडचा समावेश करतात. तुम्हाला कोण सांगितले की तुम्ही किड्या पासुन तयार केलेले ब्रेड खात आहात तर… फिनलँडमध्ये एका बेकरीवर तयार करण्यात येणारा ब्रेड प्रसिद्ध आहे. पण नुकतेच या ब्रेडच्या टेस्टमागचे कारण समजल्यानंतर लोकांना धक्का बसला.
bread1
या बेकरीत ब्रेड तयार करण्यासाठी किड्यांच्या (झिंगुर) पीठाचा वापर करतात. कंपनीच्या मते यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ते असे करत आहेत.
bread4
या बेकरी कीडे वाळवून त्यापासून तयार केलेले पीठापासुन ब्रेड तयार केला जातो. अशा प्रकारच्या ब्रेडच्या एका पॅकेटसाठी याठिकाणी जवळपास कीड्यांच्या पीठाचा वापर केला जातो. कंपनी यासाठी नेदरलँडहून पीठ आयात करते.
bread3
कंपनीच्या मते, किड्यामध्ये फॅटी अॅसिड, कॅल्शियम, लोह आणि व्हिटामिन बी12 मोठ्या प्रमाणात आढळते. फिनलँड सरकारने नुकतीच खाद्य पदार्थांमध्ये किड्यांचा वापर करण्यावरून बंदी हटवली आहे. त्यानंतर आता या बेकरीला अशा प्रकारचे जास्तीत जास्त ब्रेड विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
bread2
फूड इनसाइडर नावाच्या ट्विटर अकाऊंटने जेव्हा हा ब्रेड तयार करतानाचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा यूझर्सना जोरदार धक्काच बसला. लोकांना अशा प्रकारचा ब्रेड तयार करण्याची कल्पना जराही आवडली नाही. एका यूझरने हा प्रकार अत्यंत घृणास्पद असल्याचे सांगितले.

Leave a Comment