कुठे तयार होते काळे मीठ ?

Black-Salt
नवी दिल्ली – शरीरात आयोडीनची कमतरता भरुन काढण्यासाठी आणि अन्नाला चव आणण्यासाठी मीठाचा वापर केला जातो.
Black-Salt1
मीठाचे अनेक प्रकार आहेत. समुद्री मीठ, सेंधे मीठ आणि काळे मीठ असे वेगवेगळ्या प्रकारचे मीठ आहेत. मार्कटमध्ये रिफाइंड आणि क्रिस्टल अशा दोन प्रकारचे मीठ मिळतात. रिफाइंड मीठ पांढ-या रंगाचे असते.  याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. क्रिस्टल मीठाला सेंधे मीठ किंवा काळे मीठ असे म्हणतात.
Volcano
समुद्रामध्ये तयार होणारे मीठ सर्वांनाच माहिती आहे, पण काळे मीठ कसे तयार होते याविषयी तुम्हाला माहिती आहे का? काळ्या मीठा विषयी खुप कमी लोकांना माहिती आहे. चाट, आलू पकोडे, रायता हे चटपटीत बनवण्यासाठी काळ्या मीठाचा वापर केला जातो. काळ्या मीठाची निर्मिती ज्वालामुखीच्या दगडांपासून केली जाते. गुलाबी रंगाच्या या मीठामध्ये सोडियम क्लोराइड असते आणि यामुळे हे खारट असते. तर आयरन सल्फाइडमुळे याचा रंग थोडा जांभळा असतो. काळे मीठ लो ब्लड प्रेशर, पचनक्रिया, पोटात जळजळ, गॅस या सर्व समस्यांसाठी लाभदायक असते.