एकाच ठिकाणी पाहा जगातील सात आश्चर्य

amazing
आपण जगातील सात आश्चर्य पाहिले आहेत का ? जर नाही तर लवकरच तुम्हाला जगातील सात आश्चर्य एकाच ठिकाणी पाहाता येणार आहे. दिल्लीत हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ एक पार्क उभारले जात आहे. या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यची प्रतिकृती साकारली जाणार आहे.
दरम्यान, ही प्रतिकृती टाकाऊ वस्तू पासून बनविली जाणार आहे.

1. ताजमहल (भारत)
आकार -42 × 42 × 36 फूट
वजन – 12-13 टन
बांधकाम साहित्य – पाईप, एंगल, नट बोल्ट, 1600 सायकल रिंग, मेटल शीट, स्प्रिंग, ऑटोमोबाईल पार्ट, इलेक्ट्रिक खांब, जेवण बनविण्याची कढई.

amazing

2. गिझाचा पिरॅमिड (इजिप्त)
वजन – 10-12 टन
बांधकाम साहित्य- एंगल 20,000 फूट, इलेक्ट्रिक खांब.
amazing1
3. लीनिंग टावर ऑफ पिसा (इटली)
आकार – 38 × 10 × 10 फूट, 86 अंश वाकलेला
वजन – 10 टन
बांधकाम साहित्य – सायकल रिंग, ऑटोमोबाइल पार्ट्स, मेटल शीट्स, इलेक्ट्रिक केबल रोल.
amazing2
4. आयफेल टॉवर (पॅरिस फ्रान्स)
आकार – 24 × 24 × 6 9 फूट
वजन – 15-16 टन
बांधकाम साहित्य – एंगल, डिझेल टँक, सायकल रिंग, बागीचेतील रैलिंग.
amazing6
5. कोलोझियम (रोम)
आकार- 42 × 52 × 16.5 फूट
वजन -10 टन
बांधकाम साहित्य – कार रिम, सायकल रिम, ऑटोमोबाईल भाग, ट्रकची मेटल शीट, इलेक्ट्रिक खांब.
amazing3
6. क्राइस्ट द रिडीमर (रियो, ब्राझील)
आकार- 28 × 16 × 9 फूट
वजन – 7-8 टन
बांधकाम साहित्य – ट्रकचे धातूते पत्रे, ऑटोमोबाइल पार्ट्स , स्प्रिंग , रिक्षा आणि दुचाकीची साखळी, गार्डनचे बाक.
amazing4
7. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (न्यूयॉर्क)
आकार – 20 × 20 × 31 फूट
वजन – 6-7 टन
बांधकाम साहित्य- दुचाकी साखळी, ऑटोमोबाईल भाग, साखळी, एंगल.
amazing5
हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशनला लागू हे पार्क तयार केले जात आहे. ज्याच्या खर्च 7.5 करोड रुपये आहे. या पार्कमध्ये सौर ऊर्जाचा वापर केला जाणार आहे. यात एलईडी लावण्यात येणार आहे. पार्कमध्ये प्रवेशासाठी 100 रुपये तिकीट आकारले जाऊ शकते. हे पार्क या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्कच्या बांधकामासाठी एकूण 150 टन टाकाऊ वस्तुचा वापर केला गेला आहे. हे पार्क सात एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे.

Leave a Comment