अनोखे काम करुन हि महिला कमवत आहे लाखो रूपये

milk
साइप्रस- आपले दुध विकून साइप्रसमध्ये राहणारी एक महिला लखपती झाली आहे. आपले दुध विकून लाखो रूपये येथे राहणारी राफाएला लांप्रोउ कमवत आहे. बॉडी बिल्डिंग करणाऱ्या युवकांमध्ये राफाएलाच्या ब्रेस्ट मिल्कची चांगलीच डिमांड आहे. खरतर, काही दिवसांपूर्वी एका मुलाला राफाएलाने जन्म दिला. पण तिला कळाले की, तिच्या अंगात दुधाचे जास्त प्रमाण आहे.

याबाबत माहिती देताना राफाएलाने सांगितले की, तिला ब्रेस्ट फीडिंग दरम्यान कळाले की, तिच्या शरीरात दुध खुप वेगाने बनत आहे. डॉक्टरकडून तिने चेकअप केल्यावर कळाले की, खरच तिच्या शरीरात दुध खुप वेगाने तयार होत आहे. तिच्या बाळासाठी तिने त्या दुधाला स्टोर करायचा विचार केला पण तिला कळाले की ते खुप जास्त आहे त्यामुळेच तिने ते ऑनलाइन विकण्याचा विचार केला. राफाएलाला माहित होते की, ब्रेस्ट मिल्क प्रोटीन आणि विटामिन्सनी भरलेले असते. वेट लॉस ते बॉडी बिल्डिंग करणारे याला ऑनलाइन विकत घेतात. त्यामुळे तिने आपले दुध ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला.

तिने सांगितले की, आधी ज्या महिलांना ब्रेस्ट मिल्क न येण्याची समस्या आहे ती त्यांना आपले दुध दान करायची. पण काही दिवसानंतर आपले दुध तिने बॉडीबिल्डींग करणाऱ्या युवकांना विकायचा निर्णय घेतला. आतापर्यंत अंदाजे 50 लीटर दूध राफाएला लांप्रोउने विकले आहे. तिला त्यात 4500 पाउंड म्हणजेच भारतीय रूपयाप्रमाणे 4 लाख 5 हजार मिळाले आहेत.

Leave a Comment