तळलेल्या हवेच्या स्वाद चाखायला चला इटलीला

fried
खाद्यप्रेमीसाठी एक इंटरेस्टिंग बातमी इटलीमधून आली आहे. रेस्टॉरंटमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक जातात मात्र रेस्टॉरंटची आपसात स्पर्धा वाढली तर प्रत्येक शेफ स्वतःची काही खास रेसिपी आणि पदार्थ बनवून खवय्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात यातही नवीन काही नाही.

चीनी पदार्थांनी खवैयांच्या जिभेवर साम्राज्य स्थापन केले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. चीनी फ्राईड राईस अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. इटलीतील कॅशल फ्रांको वेनितो शहरात फीवा नावाच्या एका रेस्टॉरंटने फ्राईड एअर म्हणजे चक्क तळलेली हवा असा नवा पदार्थ सादर केला असून त्याला अरिता फ्रिता म्हणजे फ्राईड एअर असे नाव दिले आहे. निकोला दिनातो या हेड शेफने हा आगळा पदार्थ तयार केला आहे.

दिनातो सांगतो, या पदार्थात साबुदाणा वापरला जातो. पदार्थाचे नाव थोडे ट्रिकी आहे हे खरे. यात साबुदाण्याचे अगदी पातळ आवरण प्रथम भाजले जाते आणि नंतर तळले जाते. यात हवा कुठे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. मात्र हे तळलेले आवरण नंतर १० मिनिटे ओझोनमध्ये ठेवले जाते आणि कॉटन कॅन्डीवर ठेऊन ग्राहकाला सर्व केले जाते. हा पदार्थ अल्पावधीत खूपच चर्चेत आला आहे.

या पदार्थासाठी ३० डॉलर मोजावे लागता आणि येथे त्यासाठी गर्दी होते. येथील वेटर सांगतात आमच्या नेहमीच्या ग्राहकांना आम्ही हा नवा पदार्थ मोफतही देतो.

Leave a Comment