चलनातील नाण्यांसाठीचे नियम माहिती करून घ्या

coins
भारतीय चलनात प्राचीन काळापासून नाणी वापरली जात आहेत. काही काळापर्यंत २५ पैसे आणि ५० पैश्याची नाणी चलनात होती आणि सध्या १, २, ५, १० रुपयांची नाणी चलनात आहेत. या नाण्यासाठी नाणी अधिनियम २०११ अस्तित्वात असून त्याची माहिती थोड्या लोकांना आहे. हे नियम मोडणारयास तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात केली गेले आहे.

नियमानुसार चलनात असलेले नाणे घेण्यास कुणी नकार दिला तर त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करता येतो. भारतीय मुद्रा अधिनियम व इंडिअन पिनल कोड खाली संबंधितावर कारवाई केली जाते. तसेच रिझर्व बँकेकडे या संदर्भात तक्रार नोंदविता येते.
नाणी बनविताना ज्या धातूचा वापर केला जातो त्या धातूच्या किमतीपेक्षा नाण्याच्ये मूल्य कमी असता कामा नये असा नियम आहे. कारण धातूचे मूल्य अधिक असेल तर नाणी वितळवून ती विकून जादा पीस मिळविला जाऊ शकतो. हा धोका टाळावा म्हणून सध्या नाण्यांचा आकार कमी केला जात आहे.

coinset
एखाद्याला नाण्यांच्या रुपात आपल्याला किंमत द्यायची असेल तर त्यासाठीही नियम आहे. १ रु. मूल्याची १ हजारापेक्षा अधिक नाणी अश्या व्यवहारात देता येत नाहीत. असे घडले तर तो अपराध मनाला जातो. नाणे कापणे, तोडणे असा प्रकार केला तर नाण्याच्या किमतिएवध दंड आकाराला जाऊ शकतो.

एखाद्याने आपल्याला दिलेले नाणे बनावट आहे अशी शंका असल्यास ते नाणे नष्ट करण्याचा अधिकार संबंधिताला आहे. मात्र यात त्याचे नुकसान होते. अन्य वेळी नाणे वितालाविणे, नष्ट करणे अथवा त्याला नुकसान पोहोचविणे हा गुन्हा मानला जातो. तसेच नाण्याचा वापर फक्त विनिमायासाठीच करता येतो. कोणत्याची धातूचा तुकडा नाणे म्हणून वापरता येत नाही. नाणे त्याच्या मूल्यापेक्षा अधिक किमतीला विकणे हाही गुन्हा आहे तसेच नाणी वितळवून त्यापासून अन्य वस्तू तयार करणे हाही अपराध मानला जातो.

असेही समजते की भारतातील नाणी बांग्ला देशात तस्करी करून नेली जातात आणि तेथे त्यांचा वापर ब्लेड किंवा दागिने बनविण्यासाठी केला जातो.

Leave a Comment