कारचालकांसाठी असेही काही विचित्र नियम

driving-
कार चालक आणि कार चालविणे या संदर्भात देशांचे काही नियम असतात. हे नियम बनविताना त्या त्या देशाची सरकारे सुरक्षा हा प्रथम मुद्दा लक्षात घेतात. काही देशात मात्र कारचालकांसाठी विचित्र कायदे केले गेले आहेत. हे नियम मोडले तर तो अपराध मानला जातो आणि त्यासाठी शिक्षा किंवा दंड आकाराला जातो.

फिनलंडमध्ये कॅबचालक गाडीत संगीत अथवा रेडीओ लावू शकत नाही. म्हणजे प्रवासी बसले असताना त्याला संगीत अथवा रेडीओ लावता येत नाही. हा नियम मोडल्यास प्रतिवर्षी ४० डॉलर्स दंड भरावा लागतो. थायलंड मध्ये पुरुष कारचालकाना शर्ट घालूनच कार चालवावी लागते. म्हणजे तेथे कारचालक टीशर्ट घालून कार चालवू शकत नाही.

डेन्मार्क, स्वीडन देशात कार चालविताना हेडलाईट सुरु ठेवणे बंधनकारक आहे. ते बंद ठेवणे गुन्हा मानला जातो. स्वित्झर्लंडमध्ये रविवारी सकाळी कार धुणे निषिद्ध आहे. स्पेनमध्ये वाहनचालक चष्मा वापरत असेल तर त्याला एक चष्म्याची स्पेअर जोडी वाहनात ठेवावी लागते. तशी ती नसेल तर गुन्हा नोंदविला जातो. रशियात घाणेरडी किंवा धूळ असलेली कार रस्त्यावर आणणे मना आहे. म्हणजे रस्त्यावर कार आणताना ती स्वच्छ असली पाहिजे. सायप्रस देशात गाडीत खाणे पिणे यावर बंदी असून तो गुन्हा मनाला जातो.

Leave a Comment