YouTubeच्या या नव्या फीचरमुळे पालकांना कळणार आपली मुले फोनवर नेमके काय पाहतात?


नवी दिल्ली – आपल्या युजर्सला नेहमी चांगला अनुभव देण्याच्या प्रयत्नात व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) असते. आता याच दरम्यान युजर्ससाठी एक खूशखबर आहे. आता एका खास फीचरची घोषणा कंपनीने केली आहे. पालक या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी कंपनीच्या या फीचरमुळे रेस्ट्रिक्शन्स लावू शकणार आहेत. आपल्या एका ब्लॉगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सुरुवातीला बीटा टेस्टरसाठी जारी केले जाईल. पालकांसाठी एका सूपर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या माध्यमातून, आपल्या मुलांच्या यूट्यूब अकाऊंटपर्यंत पालकांचा अ‍ॅक्सेस असेल. त्यामुळे आपली मुले काय बघतात यावर पालक रेस्ट्रिक्शन लावू शकतील.

तीन वेगवेगळ्या सेटिंग्स नव्या फीचरसाठी कंपनी जारी करेल. या तीन सेटिंग्स एडजस्ट करण्यासाठी पालकांना सूपर्वाईज्ड गुगल अकाउंट देईल.

1. Explore (एक्सप्लोर) – त्या मुलांसाठी ही सेटिंग आहे ज्यांचे वय 9 वर्षाहून अधिक आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये व्लॉग्स, ट्यूटोरियल, गेमिंग, व्हिडीओज, म्यूजिक क्लिप, न्यूजचा समावेश असेल.

2. Explore more (एक्सप्लोर मोअर) – 13 वर्षाहून अधिक वयोगटासाठी ही सेटिंग आहे. ही सेटिंग इनेबल केल्यावर व्ह्यूवर्सकडे व्हिडीओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह स्ट्रीमही अ‍ॅक्सेस करता येईल.

3. Most of YouTube (मोस्ट ऑफ यूट्यूब) – मुले यूट्यूबवर जवळपास सर्वच व्हिडीओ या सेटिंगमध्ये पाहू शकतील. मुले संवेदनशील व्हिडीओ केवळ Age Restrictions वाले पाहू शकणार नाहीत.