अशा प्रकारे वाचू शकता व्हॉट्सअॅपवर डिलिट झालेले मेसेज


काही वर्षांपूर्वी भारतीय युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर लाँच केले होते. या फीचरमुळे कोणत्याही युजरला, कोणत्याही चॅटमध्ये पाठवलेला मेसेज डिलीट करता येऊ शकतो. वेळमर्यादाही मेसेज डिलिट करण्यासाठी देण्यात आली होती. एकदा डिलिट केलेला मेसेज पुन्हा वाचण्यासाठी किंवा समोरच्याने डिलिट केल्यानंतर तो परत आणण्यासाठी कोणताही अधिकृत पर्याय नाही. पण त्यासाठी दुसरी एक पद्धत उपलब्ध आहे.

iOS/iPhone युजर्ससाठी ही दुसरी पद्धत नाही. अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे युजर्स या सोप्या ट्रिकचा, व्हॉट्सअ‍ॅपवर डिलिट करण्यात आलेले मेसेज वाचण्यासाठी वापर करू शकतात. पण ही पद्धत अधिकृत, ऑफिशियल नाही. डिलिट झालेले मेसेज पुन्हा वाचण्यासाठी युजर्सला थर्ड-पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

यासाठी तुम्हाला करायचे आहे…

  • WhatsRemoved नावाचे थर्ड पार्टी अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करावे लागेल.
  • 4.90MB WhatsRemoved अ‍ॅपची साईज आहे. अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करून टर्म्स आणि कंडिशन्स अ‍ॅक्सेप्ट करावे लागेल.
  • व्हॉट्सअॅपसिलेक्ट करून त्यानंतर Continue वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर फाईल सेव्ह करावी की नाही हा पर्याय WhatsRemoved कडून विचारला जाईल. येथे हवा तो पर्याय सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर अ‍ॅप एका अशा पेजवर घेऊन जाईल, जिथे सर्व डिलिट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज दिसतील.
  • स्क्रिनवर वरच्या भागात डिटेक्टेड ऑप्शनच्या बाजूला दिसणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करावे लागेल.
  • हा ऑप्शन जसा इनेबल होईल, तसे सर्व डिलिट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचता येतील.

दरम्यान, हा डिलिट केलेले मेसेज वाचण्याचा अधिकृत पर्याय नाही. हे थर्ड पार्टी अॅप असल्यामुळे या अ‍ॅपमध्ये अनेक जाहिराती येतात. असे अ‍ॅप्स युजर्सचा डेटाही कलेक्ट करू शकतात. त्यामुळे युजर्सनी आपल्या रिस्कवर अशा अ‍ॅप्सचा वापर करावा.