‘हे’ तंत्रज्ञान सांगेल आपले आयुष्यमान

dna1
लंडन: आजकाल सोशल नेटवर्किंग साइटवर असे अनेक अॅप आहेत.  ज्यावर आपल्या मृत्यूची तारीख तसेच भविष्य देखील सांगितले जाते. याबाबत लोकांना उत्सुकता ही तेवढीच असते. यावर आता शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे.
boy
संशोधनानुसार, डीएनएची चाचणी केल्यावर अंदाज लावता येईल की एखादी व्यक्ती किती काळ जगेल किंवा किती लवकर त्या व्यक्तीचा कधी मृत्यु होईल. यूकेमध्ये मधील एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी मानवाच्या आयुर्मानवर परिणाम करणाऱ्या आनुवांशिक बदलाचा एकत्रित अभ्यास करून एक स्कोअरिंग सिस्टम विकसित केली आहे. त्यांचे हे संशोधन शोधनिबंध प्रसिद्ध मासिक लाईफमध्ये प्रकाशित  झाले आहे.
dna
एडिनबर्ग विद्यापीठाच्या अशर इंस्टीट्यूटचे पीटर जोशी यांनी स्कोरिंग सिस्टमवर म्हणाले आहे की, जर आपण व्यक्तीच्या जन्मवेळी किंवा नंतर 100 लोकांची निवड केली आणि त्यांच्या आयुष्यकाळ स्कोअरचा वापर करुन 10 गटांमध्ये व्यक्तीची विभागणी केली. तर सर्वात खाली येणारा गटापेक्षा वरच्या गटाचे व्यक्तीचे आयुष्य पाच वर्ष जास्त असेल. संशोधकांनी पाच लाखांहून अधिक लोकांच्या आनुवांशिक डेटा आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्याचा कालावधीच्या रेकॉर्डचा ही अभ्यास केला आहे.

Leave a Comment