या चित्रात लापला आहे एक प्राणी ! शोधा पाहू

pic
सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत फक्त काळ्या आणि पांढ-या रेषा दिसत आहे. परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक बघाल तर या फोटोमध्ये एक प्राणी दिसेल. न्यूझीलंडचे अभियंता डॉ. मिशेल डिकिंशन यांनी हे चित्र ट्विट केले आहे. ते म्हणाले की, भ्रम निर्माण करणारा हा फोटो तुम्ही तेव्हाच पाहू शकतात जेव्हा तुम्ही तुमचे डोके हलवून बघाल.

मात्र या फोटोला जवळू पाहू नका. फोटोला बघण्यासाठी आधी डोके डावीकडून उजवीकडे आणि नंतर उजवीकडून डावीकडून फिरविल्यानंतर या फोटोत लपलेला प्राणी दिसतो, या फोटोत मांजरीचा चेहरा लपविला आहे.

हा फोटो 846 वेळा झाला पोस्ट

मिशेल यांनी 9 जानेवारी रोजी हा फोटो ट्विट केला होता. या फोटोला अनेकांनी कमेंट केली आहे आणि आता हे पोस्ट 846 वेळा रिट्वीट झाले आहे. अनेक लोकांनी या फोटोत मांजर दिसुन येत असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला दिसली का मांजर? डॉ. मिशेल यांनी यापूर्वी देखील आपल्या ट्विटर हँडलवरुन अनेकदा असे फोटो पोस्ट केले आहेत.

Leave a Comment