जगातील या सर्वात मोठ्या शिपयार्डमध्ये केली जाते मोठ-मोठ्या जहाजांची मोडतोड

shipyard
बांग्लादेशच्या चटगाव शहराजवळ जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात स्वस्त असलेल्या शिपयार्ड मोठ-मोठ्या जहाजांची विल्हेवाट लावली जाते. जगातील सर्वात मोठे शिपयार्ड असेही बे ऑ बेंगॉलजवळ 18 किलोमीटर पसरलेल्या या ठिकाणाला म्हटले जाते. 2 लाखांहून अधिक कामगार या ठिकाणी अहोरात्र काम करत असतात. विशालकाय शेकडो जहाजांचे वर्षभरात येथे तकडे केले जातात. एवढे मोठे जहाज की त्यांच्या नटबोल्टचे वजन सुद्धा माणसांपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.

याच शिपयार्डमधून बांग्लादेशात वापरल्या जाणाऱ्या एकूण स्टीलचा 50 टक्के भाग जातो. हे मजूर मोठ-मोठ्या यंत्रांचा वापर करून एक-एक खिळा आणि नट-बोल्ट शिपपासून वेगळा करतात. यातून निघणारे स्टील एक-एक करून ट्रेलर्समध्ये भरून देशभर पाठवला जातो. त्यालाच वितळवून विविध प्रकारची साहित्ये बनवली जातात.

जगातील सर्वात स्वस्त शिपयार्ड असल्याने येथे येणाऱ्या जहाजांची संख्या इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. येथे काम करण्यासाठी मजूर सहज उपलब्ध होतात. तसेच दिवसाला फक्त 275 रुपये घेऊन 14-14 तासांसाठी काम करण्यास तयार होता. त्यामुळेच या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. लोखंड कापताना निघणारे कण, आणि विविध प्रकारच्या गॅसमुळे कित्येक मजुरांनी आपले डोळे आणि शरीराचे अंग गमवले आहेत. गेल्या 10 वर्षांत 125 हून अधिक मजुरांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात नाही.

येथे 2016 मध्ये 230 जहाजांची विल्हेवाट लावण्यात आली होती. तसेच 1 कोटी टन स्टील काढण्यात आला होता. बांग्लादेशात वापरल्या जाणाऱ्या एकूण स्टीलचा तो 60 टक्के भाग आहे. 1960 मध्ये भयंकर चक्रीवादळाने सीताकुंड किनाऱ्यावर एक मालवाहू जहाज अडकले होते. तेव्हा स्थानिक मजुरांच्या साह्याने ते कापण्यात आले होते. तेव्हापासूनच या शिपयार्डची स्थापना झाली.

Leave a Comment