सप्तरंगी चहा प्यायला चला ढाक्याला

chai
भारतात गल्लीबोळात, चौकाचौकात चहाच्या टपऱ्या आहेत आणि तेथे मोठ्या प्रमाणावर चहाविक्री होते. भारताप्रमाणे बांग्लादेशातही जागोजागी चहा टपऱ्या आहेत. मात्र त्यातील रंगधनु नावाचे चहाचे दुकान विशेष वेगळे आणि देशातील त्याप्रमाणे परदेशी लोकांच्या आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. याचे कारण आहे येथे मिळणारा सप्तरंगी चहा किंवा सतरंगी चाय.

चहाचे विविध प्रकार आपल्या माहितीचे आहे. काळा चहा, नेहमीचा दुध घातलेला चहा, ग्रीन टी आपण अनेकदा प्यायलेला असेल. पण धाक्याच्या रंगधनु मध्ये सातरंगाचा चहा मिळतो. सैफुल इस्लम यांचे हे दुकान. त्यांनी सतरंगी चाय बनविण्याची कला मौलवी बाजारातील एका चहावाल्याकडून आत्मसात केली आहे. नेहमीचा चहा या दुकानात ८ रुपयात मिळतो तर सतरंगी चहासाठी ७० रु. मोजावे लागतात.

satrangi
हा चहा बनविताना विविध प्रकारच्या स्थानिक चहाचा तसेच चीनी चहाचा वापर केला जातो. यात ३ ब्लॅक टी, १ ग्रीन टी, दुध व अन्य काही मसाले वापरले जातात. प्रत्येक चहाच्या थराचा स्वाद वेगळा असतो. केशरी, काळा, सफेद, स्ट्रोबेरी, दुध आणि हिरवा रंग यात दिसतो. हा चहा पूर्ण नैसर्गिक आहे. पांढरा थर आल्याच्या स्वादाचा असतो. हा चहा आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो.

Leave a Comment