प्रवासी ट्रेनमध्ये १०० जिलेटीनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडल्याने खळबळ


नवी दिल्ली – स्फोटकांचा साठा केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा एका महिलेकडून रेल्वे पोलिसांनी जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव रमानी असे असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. ही महिला मूळची तामिळनाडूची असून चौकशी केली असता आपण ही स्फोटके विहिर खोदण्यासाठी नेत असल्याचा दावा तिने केला आहे. रेल्वे पोलीस सध्या याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.