शिवसेना आमदाराला संभाजी भिडे यांनी काढायला लावला तोंडावरचा मास्क


सांगली – एका कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उल्लंघन केल्याचा प्रकार घडला आहे. शिवसेना आमदार अनिल बाबर सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात उपस्थित होते. भिडे यांनी स्वतःही यावेळी तोंडावर मास्क घातला नव्हता आणि त्यांनी अनिल बाबर यांनाही आपल्या तोंडावरचा मास्क काढायला लावला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका भूमिपूजनाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावात होता. शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते यावेळी भूमिपूजन करण्यात आले. संभाजी भिडे यांनी अनिल बाबर भूमिपूजन करत असताना त्यांना तोंडावरील मास्क काढण्यास सांगितला. आमदारांनीही यानंतर तोडांवरील मास्क काढून भूमिपूजन केले. विशेष म्हणजे यावेळी या कार्यक्रमात हजर असलेल्या इतर लोकांनीही तोंडावर मास्क लावला नव्हता. आता या प्रकारावर सांगली जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे.