उत्तराखंडामधील बेपत्ता झालेल्या कामगारांच्या परिवारांना नेहा कक्करचा मदतीचा हात


इंडियन आयडॉल 12 व्या पर्वातील स्पर्धक पवनदीपने या आठवड्याच्या भागात त्याच्या वडिलांनी संगीतबद्ध केलेले गाणे सादर केले आहे. त्याने आपले गाणे सादर करण्यापूर्वी सांगितले, मी आज जे गाणे गाणार आहे, ते माझ्या वडिलांनी सुरेश राजन यांनी स्वरबद्ध केले आहे. ज्याचे बोल ‘मालवा में कां करू तलाश’ (उत्तराखंडी गाणे), असे आहेत. अलीकडेच चमोली जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात जे लोक बेपत्ता झाले हे गाणे त्यांना समर्पित आहे. शेकडो कुटुंबांची या आपदेत वाताहत झाली. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, तिकडे तैनात असलेले कर्मचारी बेपत्ता झालेल्या कामगारांचा शोध घेत आहेत.

पण उत्तराखंडचे मुख्य मंत्री त्रिवेंद्र सिंह रावतजी यांना मी देखील कर्तव्य म्हणून अशा कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन करतो, ज्या कुटुंबांनी त्यांचा एकुलता एक कमावता सदस्य गमावला आहे. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांनी स्वरबद्ध केलेले गाणे म्हटले आणि शेवटी ‘हमारी अधुरी कहानी’ गाणे म्हटले.

नेहा कक्कर त्याचा परफॉर्मन्स पाहून काहीशी भावुक झाली आणि पवनदीपचे कौतुक करताना म्हणाली, तू अद्भुत गायक आहेस, हे तर आम्हां सर्वांनाच माहीत आहे, पण तू एक खूप चांगला माणूस आहेस, जे महत्त्वाचे आहे. तू बेपत्ता झालेल्या कामगारांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी धावून आलास आणि सगळ्यांनी त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन तू आपल्या मर्यादेत राहून केलेस. ही कृती खूप हृद्य होती.

उत्तराखंडच्या बेपत्ता झालेल्या कामगारांच्या कुटुंबांसाठी मी 3 लाख रु. देऊ इच्छिते आणि इतर सर्वांनीही या लोकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करते. ती एक प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती होती आणि या कुटुंबांना सध्याच्या अत्यंत बिकट परिस्थितीत मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. तिने पुढे सांगितले की, आज ‘मौसम बदल गया’ च्या जल्लोषाऐवजी आपण या संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी प्रार्थना करूया.