साहेबांचा दुसरा डाव 81 धावांवर आटोपला; विजयासाठी भारताला फक्त 49 धावांची गरज


अहमदाबाद – तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुध्द प्रथम भारतीय फलंदाजी कोसळल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी देखील अचूक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाना अक्षरशः लोटांगण घालायला लावले. फक्त 81 धावांवर इंग्लंडचा संपूर्ण डाव आटोपला असून भारतीय संघाला विजयासाठी 49 धावांची गरज आहे.

भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या फिरकी पुढे दुसऱ्या डावात इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. अश्विनने 4 तर अक्षर पटेल ने 5 बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदरने 1 बळी घेतला. इंग्लंडकडून बेन स्टोक ने सर्वाधिक 25 धावा केल्या. दरम्यान आता भारतीय संघाला विजयासाठी फक्त 49 धावांची गरज आहे. हा कसोटी सामना 2 दिवसांत संपू शकतो अशी चिन्हे आहेत.