कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द


नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणार आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी मागणी, आता जोर धरायला लागली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिटेन्शन पॉलिसीअंतर्गत पुढील वर्गात प्रमोट करण्यात येईल. परंतु विद्यार्थ्यांना सेमी ऑनलाईन क्लासेसमध्ये काय शिकवण्यात आले, हे देखील समजणे गरजेचे असून त्या आधारावर आम्हाला पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी करता येईल. त्यामुळेच आम्ही या वर्षी आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात केलेल्या वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे मूल्यांकन होणार आहे.