उत्तराखंड सरकारने चमोलीतील बेपत्ता 136 लोकांना केले मृत घोषित


नवी दिल्ली – आज उत्तराखंड दुर्घटनेचा 17 वा दिवस असून 70 लोकांचे मृतदेह आणि 29 मानवी अवयव आतापर्यंत आढळले आहेत. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर 136 बेपत्ता होते. राज्य सरकारने आता या सर्वांना मृत घोषित केले आहे. राज्य सरकारकडून याबाबत एक अध्यादेश काढण्यात आला आहे. आता मंगळवारपर्यंत दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांची संख्या 206 झाली आहे.

राज्य सरकारच्या माहितीनुसार चमोली आणि जवळच्या परिसरांमध्ये शोधमोहिम सुरू आहे. मोठ्या संख्येत लोकांचे मृत आढळले आहेत. तर काही लोकांना सुरक्षित काढण्यात आले आहे. तरीही ज्या लोकांची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही, त्यांना मृत घोषित करण्यात येईल.

चमोलीमध्ये रैणी गावाजवळ ऋषिगंगा नदीच्यावर हिमकडा तुटल्याने तयार झालेल्या आर्टिफिशयल तलावाचाही मोठा धोका आहे. तलावाच्या छोट्या तोंडामुळे पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे तलाव फुटण्याचा धोका होता. तलावाचे तोंड ITBP च्या जवानांनी सुमारे 15 फूट रुंद केले आहे. येथे पाणी साचल्यामुळे दबाव वाढत होता. राज्य आपत्ती प्रतिसाद संघाचे (SDRF) कमांडंट नवनीत भुल्लर सांगतात की, तलावाचे तोंड रुंद करण्याचे काम अजूनही सुरू आहे.

ऋषी गंगेच्या वर हिमकडा तुटल्यामुळे बनलेल्या आर्टिफिशयल तलावाची इंडियन नेव्ही, एअरफोर्सस आणि एक्सपर्ट टीमने पाहणी केली. डायव्हर्सने तलावाची खोली मोजण्यात आली. या तलावात जवळपास 4.80 कोटी लीटर पाणी होण्याचा अंदाज आहे.

हा तलाव तज्ञांच्या मते सुमारे 750 मीटर लांबीचा असून तो आणखी अरुंद होत आहे. आठ मीटर त्याची खोली आहे. या तलावाची नौदलाच्या डायव्हर्सने हातात इको साउंडर घेऊन खोली मोजली. हा तलाव जर तुटला तर त्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते हे तलाव केदारनाथच्या चौरबाडीसारखा आहे. 2013 मध्ये, केदारनाथच्या वरच्या भागात 250 मीटर लांबीचा,150 मीटर रुंद आणि सुमारे 20 मीटर खोल सरोवर तुटल्यामुळे आपत्ती उद्भवली होती. या तलावातून दर सेकंदाला सुमारे 17 हजार लिटर पाणी बाहेर येत होते.

विशेषज्ञांची टीम या तलावामध्ये होणाऱ्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आली आहे. यासोबतच ऋषिगंगा नदीमध्ये सेंसरही बसवण्यात आला असल्यामुळे नदीचा जलस्तर वाढण्याचा अलार्म वाजेल. SDRF ने कम्युनिकेशनसाठी येथे एक डिव्हाइसही लावले आहे.