या नव्या फिचरमुळे आता आपोआप डाउनलोड होणार Netflix वरील आवडते चित्रपट-वेबसीरिज


नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी स्मार्ट डाउनलोड फिचर लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) लाँच केले आहे. “Downloads for You” नावाचे नवे फिचर नेटफ्लिक्सने आणले आहे. तुम्ही या फिचरद्वारे तुमच्या आवडीचे चित्रपट किंवा वेबसीरिज डाउनलोड करु शकतात, त्यानंतर विनाइंटरनेट (ऑफलाइन) व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.

नेटफ्लिक्सवरील तुमच्या ‘हिस्ट्री’वर आधारित सुचवलेले शो किंवा वेबसीरिज Downloads for You फिचरद्वारे आपोआप डाउनलोड होतील. पण, या फिचरची मजा घेण्यासाठी तुम्हाला आधी हे फिचर ऑन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या माहितीचा वापर करावा लागेल.

“Downloads for You” फिचर सुरु करण्यासाठी

  • सध्या केवळ अँड्रॉइडसाठी ऑटोमॅटिक डाउनलोड फिचर उपलब्ध आहे. आयफोन किंवा आयपॅडसाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल.
  • नेटफ्लिक्सचे अँड्रॉइड अ‍ॅप सर्वप्रथम ओपन करा
  • आता Downloads च्या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला येथे Downloads for You हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला आता स्टोरेजबाबत विचारले जाईल, त्यानंतर फिचर ऑन होईल.

हे फिचर तुम्ही पाहिजे तेव्हा बंदही करु शकतात. येथे डाउनलोडिंग तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये नाही तर नेटफ्लिक्स अ‍ॅपच्या स्टोरेजमध्ये होईल. 1GB, 3GB किंवा 5GB पर्यंत नेटफ्लिक्सच्या अ‍ॅपमध्ये डाउनलोड मर्यादा सेट करता येते. जेवढे जास्त स्टोरेज तेवढे जास्त कंटेंट डाउनलोड होईल. नेटफ्लिक्स स्मार्ट डाउनलोड फिचर सध्या अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध आहे, लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मसाठीही हे फिचर लाँच केले जाण्याची शक्यता आहे.